एसएससी एमटीएस 2024 | SSC MTS 2024 अर्ज स्थिती | एमटीएस हवालदार भरती | SSC MTS परीक्षा तारीख | एमटीएस प्रवेश पत्र |
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार भरती 2024 साठी अर्ज स्थिती जाहीर केली आहे. अर्जदार SSC च्या प्रादेशिक वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज स्वीकारला आहे की नाही, हे तपासू शकतात. सध्या पूर्व आणि कर्नाटक विभागाच्या अर्ज स्थिती जाहीर झाल्या आहेत. प्रवेश पत्र लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
परीक्षा तारीख आणि तपशील
एसएससी एमटीएस व हवालदार भरतीची परीक्षा 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार आहे. एमटीएस पदांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती होईल, तर हवालदार पदासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेस आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मध्ये नियुक्त्या होतील. या भरतीसाठी एकूण 57 लाखाहून अधिक अर्ज आले आहेत.
एकूण पदे
SSC MTS भरतीसाठी 9583 पदे जाहीर करण्यात आली आहेत, ज्यासाठी 57 लाख 44 हजार 714 अर्जदारांनी अर्ज केले आहेत. या परीक्षेमध्ये प्रति पद 595 अर्जदारांची स्पर्धा असेल.
एसएससी एमटीएस 2024 | SSC MTS 2024 अर्ज स्थिती | एमटीएस हवालदार भरती | SSC MTS परीक्षा तारीख | एमटीएस प्रवेश पत्र
0 टिप्पण्या