नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मद्य घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या निर्णयानंतर केजरीवाल आज तिहार तुरुंगातून सुटणार आहेत. त्यांनी १७७ दिवस तुरुंगात घालवले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी ठेवल्या आहेत. केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्यास परवानगी नाही, तसेच कोणत्याही शासकीय फाईलवर स्वाक्षरी करता येणार नाही.
मद्य घोटाळा प्रकरण:
दिल्ली सरकारच्या २०२१च्या मद्य धोरणाअंतर्गत, मद्य परवाना वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणात दिल्ली सरकारवरील नेत्यांवर निवडणूक प्रचारासाठी किकबॅक स्वरूपात मद्य व्यवसायिकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.
key words:
0 टिप्पण्या